ठाणे: कळवा, मफतलाल झोपडपट्टीतील हनुमान चाळीच्या नाल्यात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखीचा कोणीतरी गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघड झाली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकासह खून्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टी परिसरातील नाल्यात मिळालेल्या या अनोळखीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला ९ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वा. च्या सुमारास नाल्यात टाकल्याचे पोलीस चौकशीत आढळले. ज्याचा खून करण्यात आली ती व्यक्ती सुमारे ३० ते ३५ वर्षीय असून त्याने काळया रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याबरोबर त्याचीही ओळख पटविण्यात येत आहे. तसेच हा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, या सर्व बाबींचाही तपास करण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत..........................असे आहे मृतदेहाचे वर्णनअंदाजे ३० ते ३५ वयोगटातील या मृतदेहाच्या अंगावर काळया रंगाची जीन्स पॅन्ट आहे. तिच्या उजव्या खिशाच्या बाजूला इंग्रजीमध्ये पांढऱ्या अक्षरात फॅशन १९९४ असे डिझाईन असून डाव्या खिशाच्या बाजूला स्टईलिश उ१९८८ जीन तसेच पाठीमागील बाजूला कमरेजवळ इंग्रजीमध्ये मेन्स कलेक्शन असे स्टीकर आहे. तर पाठीमागील दोन्ही खिशांवर पांढºया अक्षरात फॅशन जेएनएस असे लिहिलेले आहे. हुक असलेला उकाळया रंगाचा बेल्टही आहे. कोणाशीतरी झालेल्या वादातून त्याचा गळा आवळून खून केल्याचे बोलले जात आहे..................
धक्कादायक: खून करुन कळव्यातील नाल्यात फेकला पुरुषाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:49 IST
मफतलाल झोपडपट्टीतील हनुमान चाळीच्या परिसरात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली. त्याचा खून रविवारी सकाळी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
धक्कादायक: खून करुन कळव्यातील नाल्यात फेकला पुरुषाचा मृतदेह
ठळक मुद्दे मफतलाल कंपनी झोपडपट्टीच्या नाल्यात मिळाला मृतदेह कळवा पोलीस ठाण्यात गुन्हानातेवाईकांचाही शोध सुरु