शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:53 IST

दारुसाठी कुटूंबीयांकडून पैसे मिळत नाहीत. तसेच मारहाणीची तक्रारही वडिलांनी पोलीस ठाण्यात केली. याच रागातून सागर सुर्वे (३१) याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १२ जानेवारी रोजी रात्री घडली. सुदैवाने त्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्यपी मुलाने मारहाण केल्याची तक्रार विजय बाबुराव सुर्वे (५०) यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सागर सुर्वे (३१) याच्याविरुद्ध दिली होती. याच रागातून सागर याने दारुच्या नशेतच राहात्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्याला बोलण्यात गुंतवून स्थानिक रहिवाशी आणिव्यसन असल्यामुळे सागर हा त्याचे वडील आणि पत्नीकडे नेहमीच दारूसाठी पैशांची मागणी करीत होता. पैसे न दिल्याने तो त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही करीत होता. १८ जानेवारी रोजीही दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने वडिलांना मारहाण केली होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदविली होती. १९ जानेवारी रोजीही अशाच भांडणातून त्याने स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार केले. या नंतर त्याने वास्तव्याला असलेल्या वागळे इस्टेट रामचंद्र नगर येथील तन्मय सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी त्याला बोलण्यात गुंतविले. नंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासात त्याची सुटका केली. त्याने यापूर्वीही दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि उपनिरीक्षक फड यांनी त्याचे समुपदेशन करून अशा प्रकारे आत्महत्या करण्यापासून त्याला रोखल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे