लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अश्लील चित्रफित दाखवून एका १२ वर्षीय मुलाशी लैंगिक चाळे करणाºया सुनिल जाधव (४५, रा. रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.वागळे इस्टेट भागात राहणाºया या मुलाला १६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईने त्यांच्या ओळखीतील सुनिल जाधव यांच्या वखारीमध्ये लाकूड कापण्यासाठी पाठविले होते. मात्र, आपल्या वखारीत करवत नसल्याचा बहाणा करीत त्याने या मुलाला शांतीनगर येथील त्याच्या घरी नेले. तिथे घराला आतून कडी लावून त्याला आधी मोबाईलमधील काही अश्लील क्लिपिंग दाखविल्या. नंतर त्याच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार या मुलाने घरी त्याच्या पालकांना सांगितल्यानंतर याप्रकरणी रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक वैशाली रासकर यांच्या पथकाने कथित आरोपी सुनिल याला अटक केली.
धक्कादायक! अश्लील चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 21:52 IST
अश्लील चित्रफित दाखवून एका १२ वर्षीय मुलाशी लैंगिक चाळे करणाºया सुनिल जाधव (४५, रा. रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
धक्कादायक! अश्लील चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईबालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल