शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

फ्लॅश मीटरचा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: November 10, 2016 06:32 IST

नव्या फ्लॅश मीटरमुळे भरमसाट रकमेच्या बिलांचा शॉक महावितरणने ग्राहकांना दिला असून, वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले पाहून सर्वांना धक्का बसत आहे.

वसई : नव्या फ्लॅश मीटरमुळे भरमसाट रकमेच्या बिलांचा शॉक महावितरणने ग्राहकांना दिला असून, वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले पाहून सर्वांना धक्का बसत आहे.एमएसईबीच्या काळातील जुने मीटर बदलून महावितरणने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवले होते. ते अल्पावधीतच सदोष झाल्यामुळे बदलून आता महावितरणने फ्लॅश मीटरचा वापर केला. या मीटरचे रीडिंग कॅमेऱ्याद्वारे टिपून त्यानुसार ग्राहकांना बिले दिली जात होती. त्यामुळे वाजवी बिले येत असल्याचे समाधान ग्राहक व्यक्त करीत असतानाच महावितरणने त्यांना ४४० व्होल्टपेक्षा जबर शॉक दिला. हे मीटर बिघडले. शेकडो मीटरचा डिस्प्लेच निकामी झाला.रीडिंग घेणाऱ्या ठेकेदाराकडून ही बाब महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे बंद झालेल्या मीटरचा फोटो डेटा बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यांनीही आपले कर्तव्य बजावताना मागील महिन्याच्या रीडिंगमध्ये एकने वाढ करून बिले काढली. ठेकेदार आणि बिल काढणाऱ्यांकडून अशी टोलवाटोलवी केल्यावर त्यानंतरच्या महिन्यात तर अशा ग्राहकांना नेहमीच्या बिलापेक्षा दहा-अकरा पटीने वाढ करून बिले पाठवण्यात आली. ही बिले पाहून ग्राहकांची झोपच उडाली. त्यांनी कामाला दांडी मारून महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे धाव घेतली.या कार्यालयाकडून मागील सर्व बिले आणि वाढीव रीडिंग पाहिल्यानंतर मीटर फॉल्टी असल्याचा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट घेऊन अकाउंट कार्यालात दोन-तीन टेबलांवर धक्के खाल्ल्यानतंर अ‍ॅव्हरेज बिले ग्राहकांच्या हाती पडली. ती भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रात पुन्हा रांग लावून बिले भरल्यावर सुटका झाल्याचे समाधान ग्राहकांना मिळाले. पण तोपर्यंत कामाची दांडी, दगदग, मानसिक त्रास आणि प्रवासाचा खर्च हा भुर्दंड त्यांना सोसावा लागला. महावितरणच्या चुकीमुळे मीटर फॉल्टी होत आहेत. मात्र, तसे मीटर चेक करण्यासाठी ग्राहकांना फी भरावी लागते. तसेच मीटर फॉल्टी निघाल्यानंतर नवीन मीटर लावण्यासाठी टेस्टिंग फीही त्यांना द्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)