शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवशाही बसला ट्रकची धडक ; ट्रक चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 10:36 IST

Thane Shivshahi News: बांधकाम साहित्य घेऊन भरधाव वेगाने ठाण्याकडे येणाऱ्या ट्रकने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठाणे:  बांधकाम साहित्य घेऊन भरधाव वेगाने ठाण्याकडे येणाऱ्या ट्रकने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्या जवळील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ येथे घडली. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. तर सुदैवाने बसमधील प्रवासी जखमी झाले नसून बसच्या खिडकीच्या काचा फुटून बसचेही नुकसान झाले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये दहा प्रवासी होते. तर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती.      शिवशाही बस चालक उद्धव ढाकणे (४०) हे ठाणे - नालासोपारा असे दहा प्रवासी घेऊन जात होते. त्यांची बस घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ आली असताना, समोरून भरधाव वेगाने गुजरात येथून ठाण्यातील बाळकुम येथे बांधकाम साहित्य ( रेती,माती) घेऊन ट्रक चालक शबुद्दीन खान (३८) हा येत होता. त्याचदरम्यान ट्रकने शिवशाही बसला जोरदार धडक बसली. यामध्ये बसच्या एका बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून बसचेही नुकसान झाले आहे.पण बसमधील कोणीही जखमी झाले नाही. तर ट्रकचीही काच फुटली आहे. तसेच ट्रक चाकल खान हा जखमी झाला असून त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी बसमध्ये असलेले दहा प्रवासी अचानक झालेल्या या अपघातामुळे घाबरून गेले होते.  रस्त्यावर अपघातग्रस्त ट्रक उभा राहील्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह कासारवडवली पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. तसेच तातडीने पोलिसांनी क्रेन बोलवून तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यावर साधारण सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

टॅग्स :AccidentअपघातShivshahiशिवशाहीthaneठाणे