शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून शिवसेनेच्या कोंडीचा होतोय प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:31 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी हे पद तांत्रिक अडचणीचे असून महाराष्टÑ महापालिका अधिनियमानुसार विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाचा नेता महापौरांनी जाहीर केल्यास त्या पदावर त्याच नेत्याची (गटनेते) नियुक्ती करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महापौर डिम्पल मेहता यांनीही राज्य सरकारचा अभिप्राय मागवला आहे. त्यामुळे सेनेची तांत्रिक कोंडी करण्याची खेळी भाजपाकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.पालिका स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीतील सत्ता स्थापनेच्या वेळी विरोधी पक्षनेतेपद तांत्रिक अडचणीतच सापडले आहे. २००२ मधील पहिल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्या वेळी सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे परशुराम पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या पदावर विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाचा दावा असताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने विरोधी पक्षातील भाजपाचे सदस्य रोहिदास पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांचा दावा फोल ठरल्याने परशुराम पाटील त्या पदावर कायम राहिले.२००७ मधील निवडणुकीनंतरही सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे चंद्रकांत वैती यांची त्या पदावर वर्णी लावल्याने त्याविरोधातही विरोधकांनी आवाज उठवला. परंतु, त्याचा ठोस पाठपुरावा न झाल्याने वैती हे त्या पदावर कायम राहिले. २०१२ मधील निवडणुकीनंतर सुरुवातीला काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीची सत्ता होती. त्या वेळी नरेंद्र मेहता यांची त्या पदावर नियुक्ती झाली होती. आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर शिवसेना-भाजपा युतीची सत्ता स्थापन झाली. त्या वेळी विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष राष्टÑवादी असतानाही तत्कालीन महापौर गीता जैन यांनी राष्टÑवादीने सदस्यांच्या नावाची शिफारस न केल्याचे कारण पुढे करून काँग्रेसने केलेली शिफारस ग्राह्य धरली. त्यानुसार, त्यांनी काँग्रेसचे प्रमोद सामंत यांची नियुक्तीकेली.यावर, राष्टÑवादीने आक्षेप घेत त्यावर नियमानुसार पक्षाचा अधिकार असल्याचा दावा करत लियाकत शेख यांच्या नावाची शिफारस केली. परंतु, महापौरांनी ती अमान्य केल्याने राष्टÑवादीने त्याविरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली. परंतु, त्याला विलंब होऊ लागल्याने त्यावेळचे राष्टÑवादी गटनेते बर्नड डिमेलो यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयाने राष्टÑवादीचा दावा मान्य केल्याने अवघ्या ६ महिन्यांत सामंत यांना ते पद सोडावे लागले. यानंतरही यंदा त्या पदावरील नियुक्तीचा वाद उफाळून आला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर