शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर शिवसेनेचा भर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:17 IST

सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातूनही ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

ठाणे : सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातूनही ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची वॉर रूम सज्ज झाली आहे. तेथून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सध्या टप्याटप्याने प्रचार सुरू आहे. विचारे यांच्या आॅफिशल फेसबुक पेजला २८ हजार ६३२ जणांनी फॉलो केले आहे. परंतु, सोशल मीडियावर जसा जोमात प्रचार होणे अपेक्षित आहे, तसा अद्याप शिवसेनेकडून होत नसल्याचे पाहायला मिळते.तरुण मतदारांचा टक्का हा ठाणे लोकभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तीन लाखांहून अधिक मतदार हे तरुण मतदार असून त्यांची मते ही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. यासाठी वॉर रुम सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून या रूममधून सोशल मीडियावर विचारे यांचा प्रचार सुरु झाल्याचे दिसत आहे.विचारे यांचे आॅफीशली फेसबुक पेज असून, त्यावर दररोज ५ च्या आसपास पोस्ट सध्या टाकल्या जात आहेत. तेवढ्याच प्रमाणात व्हिडीओही पोस्ट केले जात आहेत. त्याला दररोज सुमारे चार हजारांच्या आसपास लाइक्स मिळत आहेत. तर रॅली, चौकसभांच्या फोटांना सुमारे ४०० पर्यंत लाइक्स मिळत आहेत.>कशी चालते यंत्रणा?सोशल मीडियाच्या वारॅरुममध्ये आठ ते दहा तरुण काम करीत आहेत. रोजच्या रोज कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून अपडेट केला जात आहे.फेसबुक पेज अपडेट ठेवणे, व्हॉट्सअ‍ॅपला पोस्ट टाकणे ते शेअर करण्यासाठी इतरांना सांगणे.उमेदवाराचे व्हिडीओ तयार करणे, मतदारांचा डाटा तयार करणे, रोजच्या प्रचार रॅली, चौकसभा आदींची माहिती प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराने टीका केल्यास त्याचे उत्तरही सोशल मीडियाद्वारे देणे आदी कामे सुरू आहेत.>500 लाइक्स शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या फेसबुक पेजला आहेत. त्यांच्या पेजवरून रोज चार ते पाच पोस्ट टाकल्या जातात. दररोजच्या दौऱ्यांचे अपडेट्सही दिले जातात. 4,050 जणांना विचारे यांच्या वॉर रूमच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपच्या पोस्ट रोज पाठवल्या जातात. त्यातील अनेक कार्यकर्ते या पोस्ट नंतर व्हायरल करतात.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे