शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजप-मनसेचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 17:41 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पण हे तर मध्य रेलवेच्या महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी याआधीच जाहिर केले होते, त्यात खासदार शिंदेंचे योगदान काय? असा सवाल करत हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संताप मोर्चाचे फलीत असल्याचा दावा मनसेने केला आहे. तर भाजपने ‘लोकमत’मधील १६ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतून जादा लोकल सोडा ही मागणी जीएमकडे केली असल्याने फे-या मिळाल्या असे होर्डिंग्ज शहरभर लावले. त्यामुळे वाढीव फे-यांवरुन रंगलेल्या श्रेयवादाच्या राजकारणाची चर्चा रंगली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह शहारध्यक्ष मनोज घरत म्हणाले की, खासदार शिंदे हे केवळ प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. मध्य रेल्वेने २८ सप्टेंबर दस-याच्या निमित्ताने जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १ नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणेपुढील प्रवाशांना दिलासा मिळणार असे स्पष्ट नमूद केले होते. मात्र तरीही शिंदेंनी केलेला प्रयत्न हा केविलवाणा होता. शिंदेंसोबत जाणा-या प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांवरही कदम यांनी नाराजी व्यक्त केली. आता संघटनाही प्रसिद्धीच्या मागे लागल्या का? असा टोला त्यांनी लगावला.घरत म्हणाले की, संताप मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या आवाहनानूसार गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरात फेरिवाले बसत नाहीत हे सकारात्मक चित्र आहे. तसेच त्या मोर्चाच्यावेळी रेल्वे अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत देखिल ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्या उपनगरिय प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी यांनी मांडल्या होत्या हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे सर्व यश हे संताप मोर्चाचे असून ते लाटण्याचा प्रयत्न करु नये असे कदम म्हणाले.चौकट: खासदार शिंदेंनी अंबरनाथ स्थानकाचा कायापालट होणार, हे होणार ते होणार असे सांगितले. पण ते कधी होणार, त्याचे डेटलाइन काय? ते प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार का? असे सवाल मनसेने उपस्थित केले. की गेल्या तीन वर्षांप्रमाणेच या घोषणाच आहेत का? जे आहे ते सांगा की असे कदम म्हणाले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणे