ठाणे : नांदेड येथे पार पडलेल्या ४३ व्या कॅडेट व ज्युनिअर राज्य ज्युदो स्पर्धेत शिवानी पाटीलने सुवर्णपदक मिळवत उत्कृष्ट ज्युदोपटू होण्याचा मान मिळविला आहे.या स्पर्धेसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून ३०० ज्युदोपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांची वडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिवानी हिने ५२ किलो गटामध्ये सुवर्णपदक, साहिल मेंडन याने ५५ किलो गटातून सुवर्णपदक, जयेश समसने ७३ किलो गटातून रौप्यपदक मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना ज्युदो सरावासाठी देवीसिंग राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
शिवानीला ज्युदोचे सुवर्ण
By admin | Updated: November 24, 2015 01:30 IST