शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हापरिषद सदस्य , सरपंचाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:22 IST

भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक ...

ठळक मुद्दे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात काम सुरू केल्याने तीन भावांसह १५-२० जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांच्या भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टाने अर्ज फेटाळल्याने त्यांना हायकोर्टाने भिवंडी कोर्टात हजर रहाण्यास सांगीतले.भिवंडी कोर्टाने तीन भावांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत

भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक वीज जाणे,वीज पुरवठ्यात बिघाड होणे व अनाधिकृत वीज केबलचे जाळे वाढणे अशा वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्यामुळे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात जाऊन दुरूस्तीची कामे सुरू केली. त्यावेळी गावातील एका जमावाने कर्मचा-यांना शिवीगाळी करीत मारहाण करीत होती. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिका-यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,सरपंच देवराज नाईक व त्यांचा भाऊ निलम नाईक यांच्यासह अनेकांच्या नांवे नोंद केली होती. या गुन्ह्यातील काही जणांना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले होते.परंतू शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांचा भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. सेशन कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी काल गुरूवार रोजी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.त्यावेळी हायकोर्टाने तीन भावांना भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर रहाण्यास सांगीतले. त्यानुसार तिघे नाईक बंधू आज शुक्रवार रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले.पोलीसांनी त्यांना अटक करून कोर्टात हजर केले असता भिवंडी कोर्टाने त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. या घटनेने तालुक्यात वीज ग्राहकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा