शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:05 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणा-या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी बुधवारी (9 मे) निवडणुकीच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले. यात शिवसेनेच्या विनिता राणे यांच्या गळ्यात महापौर पदाची तर भाजपाच्या उपेक्षा भोईर यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली. राणे या 13व्या महापौर ठरल्या आहेत. बुधवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली.  त्यासाठी शनिवारी (5 मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उल्हासनगरच्या सत्तांतराच्या राजकारणात भाजपा कल्याणमधील महापौरपदाचा दावा सोडेल, असे वृत्त लोकमतने दिले होते. 

त्याप्रमाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून विनिता राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु शिवसेना सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज सादर करणा-या भोईर यांनी महापौरपदासाठी देखील अर्ज भरला आणि तो सचिव जाधव यांना सुपुर्द केला. 

प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना भाजपामध्ये युतीचे चित्र दिसून आले असताना काही वेळातच घडलेली नाट्यमय घडामोड चर्चेचा विषय ठरली होती.  दरम्यान महापौरपदासाठी अर्ज दाखल करणा-या उपेक्षा भोईर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी केला होता. 

उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर भोईर आणि तानकी यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते तर दुसरीकडे भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी मात्र  निवडणुकीच्या वेळीच काय तो निर्णय होईल असे सांगत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर निवडणुकीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.

पालघरच्या घडामोडींचा परिणाम नाही!पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत चिंतामण वनगा यांच्या मुलाला पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याने त्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. त्याचे पडसाद या निवडणुकीवर पडतील, असे काही नाराजांकडून पसरवले जात होते. मात्र मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या काळातही कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहिली होती. तेच सूत्र या निवडणुकीतही पाहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांत हे दोन्ही पक्ष गरजेनुसार निर्णय घेतात, हेच दिसून आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा