शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रियेश जाधव यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:56 IST

गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन अर्ज आल्याने अ‍ॅड. प्रियेश जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

बदलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन अर्ज आल्याने अ‍ॅड. प्रियेश जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. भाजपच्या राजश्री घोरपडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.भाजप-शिवसेनेत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाल्याने निवडणुकीची संधी साधत भाजपने सेनेसोबत सत्तेत वाटेकरी होण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीनंतर पालिकेत शिवसेना-भाजपने जल्लोष केला.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने थांबली होती. अखेर, निवडणूक आयोगाने ही निवडणूक घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देताच दि. २ मे रोजी ही निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजता पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंह गिरासे यांनी कामकाज पाहिले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अ‍ॅड. प्रियेश जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या राजश्री घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली.भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सत्तेत सहभाग घेतला. गेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला उपनगराध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांची मने पुन्हा जुळल्याने त्यांनी पालिकेतील सत्तेकरिता युती केली. त्यामुळे आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. नगराध्यक्षपदी जाधव यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी पालिकेबाहेर जल्लोष केला. नगराध्यक्षांना पदभार देण्यासाठी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख वामन म्हात्रे हजर होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाbadlapurबदलापूर