शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील शिवसेनेचे ‘स्थायी’ सदस्य ठाण्याच्या हॉटेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 02:19 IST

Ulhasnagar News : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे विजय पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन व भाजपच्या एका सदस्याला राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपकडून फोडाफोडी होऊ नये, याकरिता शिवसेनेने कडेकोट बंदोबस्त केला आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या उद्या (गुरुवारी) होणाऱ्या निवडणुकीकरिता भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी बुधवारी व्हीप जारी केला, तर शिवसेनेने आपल्या पाच सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य अशा एकूण सात सदस्यांची ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्याची व्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे विजय पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन व भाजपच्या एका सदस्याला राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपकडून फोडाफोडी होऊ नये, याकरिता शिवसेनेने कडेकोट बंदोबस्त केला आहे.उल्हासनगरात स्थायी समिती सभापतीपदाची ही निवडणूक गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना आघाडीचे सभापतीपदाचे उमेदवार भाजपचे समिती सदस्य विजय पाटील हेही इतर सदस्यांसोबत हॉटेलात मुक्काम करून आहेत. एकूण १६ सदस्यसंख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे-९, शिवसेना-५, तर रिपाइं-राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे सदस्य असलेले पाटील हे शिवसेनेच्या वतीने रिंगणात उतरले असून भाजपचे दुसरे समिती सदस्य प्रकाश नाथानी यांनी मंगळवारी सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना आघाडी बहुमतात आली असून पाटील यांचा विजय निश्चित आहे. 

विजय पाटील यांच्या घराला व्हीप चिकटवलामहापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी पक्षाच्या सर्वच्या सर्व आठ स्थायी समिती सदस्यांना व्हीप जारी केला. पक्षाचे समिती सदस्य पाटील हे शिवसेनेचा पाठिंबा घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासकट सर्व समिती सदस्यांचा मुक्काम ठाणे येथील एका हॉटेलमध्ये आहे. भाजपने काढलेला व्हीप पाटील यांच्या घराबाहेरील दरवाजावर चिकटवला असल्याची माहिती पुरस्वानी यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा