शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:28 PM

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले.

कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लीम समाजाची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजामध्ये वाद होऊ नये म्हणून याठिकाणी ईद निमित्त नमाज पठण होत असताना आरती व घंटानाद करण्याकरीता हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याचा निषेध म्हणून १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. दरम्यान राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेत पडलेले दोन गट पाहता यंदाच्या आंदोलनाबाबत उत्सुकता होती. परंतू सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात घोषणाबाजी आणि आरती करत घंटानादा आंदोलन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ते आजतागायत दरवर्षी सुरू आहे. आज सकाळीच शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेकडील टिळक चौक शहर शाखेतून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केला होता. लालचौकी याठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता यावेळी आरती देखील करण्यात आली. आरती नंतर पोलिसांनी आंदोलक  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

मग त्यांच हिंदूत्व खोट आहे का! -आनंद दिघे यांनी सुरू केलेले हे आंदोलन तीस वर्षांपासून सुरू आहे, घटनेने हिंदूंना दिलेला दर्शनाचा अधिकार हिरावला जातोय, यावर्षी आम्हाला अपेक्षा होती. कधीकाळी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे, पक्षप्रमुखांना खाली उतरवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्यांनी हा अन्याय  दूर करायला पाहिजे होता, जर खरे हिंदुत्व असते तर मंदिर उघडायला पाहिजे होते, त्यांचे हिंदुत्व खोटे आहे का? हा प्रश्न आज पडलाय. हे सरकार जर हिंदुत्ववादी आहे, तर हा अन्याय दूर करायला पाहिजे होता, असा टोला एकनाथ शिंदे यांना नाव न घेता महानगरप्रमुख विजय साळवी यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBakri Eidबकरी ईदthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे