शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

केडीएमटी सभापतीपदावरही शिवसेनेला सोडावे लागणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 01:33 IST

केडीएमसीचे स्थायी समिती सभापतीपद गमावण्याची नामुश्की शिवसेनेवर ओढावली असताना आता परिवहन समितीच्या पुढील सभापतीपदावरही सेनेला पाणी सोडावे लागणार आहे.

कल्याण : केडीएमसीचे स्थायी समिती सभापतीपद गमावण्याची नामुश्की शिवसेनेवर ओढावली असताना आता परिवहन समितीच्या पुढील सभापतीपदावरही सेनेला पाणी सोडावे लागणार आहे. परिवहनचे सभापतीपद सध्या स्वत:कडे असताना पुन्हा ते आपल्याकडेच राखण्याचा चंग बांधला गेला होता. मात्र, आता संख्याबळाच्या आधारे हे पद भाजपकडेच जाणार असल्याने सेनेचे मनसुबे धुळीस मिळण्याची दाट शक्यता आहे.परिवहन समितीमधील सहा सदस्य विहित कालावधीअंती गतवर्षी २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीनंतरचे समितीतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद त्यावेळी शिवसेनेकडे होते. त्यामुळे सेनेचे सात सदस्य समितीमध्ये होते. परिवहनचे सभापतीपद शिवसेनेकडे असताना विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या सत्तांतरात पुढील सभापतीपदही आपल्याकडेच कायम राखण्याचा पवित्रा सेनेने घेतला होता. दुसरीकडे भाजपनेही सभापतीपद मिळालेच पाहिजे, असा चंग बांधला होता. पण, आता स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर भाजपचे पारडे जड झाले आहे. काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने स्थायीचे सभापतीपद पटकावल्याने संख्याबळाच्या आधारे परिवहनचे सभापतीपदही पटकावणे भाजपला सहज शक्य झाले आहे. परिवहनमध्ये सेना आणि भाजपचे समसमान प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असल्याने आता भाजपकडे सात सदस्य आहेत. त्यामुळे स्थायी समितीपाठोपाठ परिवहन समिती सभापतीपदही भाजपकडे जाणार, यात शंका नाही. परिवहन सभापतीपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो, त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती होऊ शकली नव्हती, ती निवडणूक जूनमध्ये झाली होती. मागील निवडणुकीत शिवसेनेचे मनोज चौधरी बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक उशिरा झाल्याने त्यांना नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला. आता आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केडीएमसीच्या निवडणुका असल्याने नव्याने निवडून येणाऱ्या सभापतींनाही सात महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.>दोन दिवसांत भूमिका स्पष्ट होईलस्थायी समितीमध्ये सर्वाधिक आठ सदस्य असतानाही शिवसेनेला सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे वामन म्हात्रे आजारी असल्याने निवडणुकीला उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत, त्यांनी एकनाथ शिंदे आणि विनीता राणे यांना पत्र पाठवले होते. पण, अनुपस्थितीबाबत कारवाई होईल, असे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निवडणुकीनंतर स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या सदस्या हर्षदा भोईर यांनीही पक्षादेश डावलल्याने त्यांच्यासह गटनेते नंदू म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवण्यात येईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पण, दोन दिवस उलटूनही ठोस कृती झालेली नाही. दरम्यान, दोन दिवसांत ठोस भूमिका घेऊ, असे दोन्ही पक्षांकडून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.