शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 20:18 IST

Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: "अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?" असा सवालही राजन विचारेंनी केला.

Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे गटाने ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट दिले आहे. तर ठाकरे गटाकडून राजन विचारेंना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दरम्यान आज राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादायक दावा केला. "एकनाथ शिंदेंना कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते. शिवाजी मैदानात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता. पण उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मी नरेश म्हस्केंना त्यांच्या घरी जाऊन समजावले. शिंदे आणि तुमचं जे असेल ते असेल पण शिवसेनेसाठी सोबत राहा. त्यावेळी नरेश म्हस्के राहिले," असा खुलासा राजन विचारे यांनी केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे स्वत: 2013मध्ये ४ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते!

"एकनाथ शिंदे स्वत: आमदार असताना 2013 साली काँग्रेसमध्ये चालले होते. ते कोणत्या पक्षाशी प्रामाणिक राहिले आहेत का? शिंदे आणि चार आमदार असे पाच जण पक्षप्रवेश करणार होतात. पण तेव्हा ते चार आमदार म्हणाले की आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार. त्यामुळे ते बंड फसलं. तुम्ही केवळ सेटिंग करत राहिलात. मनसे फोडली, भाजपा फोडली, काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकं फोडली. आज ठाणे जिल्ह्याची परिस्थिती काय झाली आहे ते बघा," असा गौप्यस्फोट राजन विचारेंनी केला

मी सामान्य कार्यकर्ता, माझ्याकडे 'खोके' नाहीत!

"२०१४ला एकनाथ शिंदे आपल्या मुलासाठी म्हणजेच श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यातील संपूर्ण शिवसेना घेऊन कल्याणमध्ये गेले होते. त्यावेळी अशा बातम्याही आल्या होत्या की शिंदे हे राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून कल्याणमध्ये प्रचार करण्यात व्यस्त आहेत. पण अशा परिस्थितीतही मी २०१४ आणि २०१९ ला निवडून आलो. मला निवडून येण्यासाठी पैसे खर्च करावे लागले नाहीत.  बाळासाहेब ठाकरेंनी मला मोठे केले. मी सामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातील माणूस, माझ्याकडे खोके नव्हते," असा खोचक टोला विचारेंनी लगावला.

बंडाच्या वेळी शेवटपर्यंत मी शिंदेंसोबत होतो, पण...

"एकनाथ शिंदे यांची दोन मुलांचे जेव्हा निधन झाले तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता त्यावेळीही मी त्यांच्यासोबत होतो. विधानपरिषदेत जेव्हा बंड किंवा गद्दारी करण्याचा डाव सुरु होता, त्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायची ऑफर दिली होती. त्यांच्यासाठी बंगला सोडला होता. पण खुर्चीसाठीच हे सारं केलं गेलं. कारण तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती. ठाणेकरांना माहिती आहे की राजन विचार काय आहे, नरेश म्हस्के काय आहे आणि एकनाथ शिंदे काय आहेत?" अशी बोचरी टीका त्यांनी केली.

धर्मवीर चित्रपटावरून आरोपांना प्रत्युत्तर

"धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या खिशातून पैसे घालून काढला नाही. सर्व कार्यकर्त्यांनी पैसे जमवले होते. त्यांनी यात काहीच खर्च केलेला नाही. मी अनेकांना शो दिले होते. प्रत्येक विभागप्रमुखाला शो दिले होते. तुमच्याकडे त्यावेळी ठाणे महापालिका होती. तुम्ही आनंद दिघेंबद्दल काय सांगताय. तुम्ही आलात कधी... या राजन विचारेने तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे काढलेत आणि अजूनही पक्षाशी प्रामाणिक आहे. मी बोलत नाही, अजूनही बोललेलो नाही, मला बोलायला लावू नका," असा इशारा त्यांनी दिला.

अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?

"तुम्ही आणि नरेश म्हस्केंनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, टेंडर सेटिंग चालायचं. सर्व महापालिका रिकामी करून टाकली आहे. शासनाकडून पैसे घेऊन महापालिकेचा कारभार चालवावा लागतोय. महिन्यापूर्वी महापालिकेत फक्त १५ कोटी रूपये होते. शासनाकडून निधी आणून ही महापालिका चालवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीच्या पैशांवर डल्ला मारला आहेत. अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते? घरात हात धुवत बसले होते. पण आम्ही रस्त्यावर उतरलो. जनतेची सेवा केली. मनसेने आंदोलन केल्यानंतर नरेश म्हस्के बाहेर आले होते," असा खरपूस समाचार त्यांनी घेतला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rajan vichareराजन विचारेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४naresh mhaskeनरेश म्हस्केEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthane-pcठाणे