शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये रस्ते बुजविण्याचे निकृष्ट दर्जाचं काम शिवसेनेने पाडलं बंद; सत्ता यांची बोंबही हेच ठोकतात मनसेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:48 IST

शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं.

ठळक मुद्देशहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं. सत्ताधारी शिवसेनेचा कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने वीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला रस्त्यावर उतरून काम बंद पाडण्याची वेळ आली आहे.

कल्याण- शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं. सत्ताधारी शिवसेनेचा कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने वीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला रस्त्यावर उतरून काम बंद पाडण्याची वेळ आली आहे. मातीमिश्रित गिरीटने रस्ते बुजवण्याचे काम सुरु होते. तसेच त्यात चप्पलही सापडली. या कामांवर आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने याला आयुक्तच जबाबदार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. 

शिवसेना वीस वर्षे सत्तेत आहे. सत्ताही यांचीच आणि कामे चांगली झाली नाहीत याची बोंबही हेच ठोकताहेत अशी खरमरीत टिका मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे. काळ्या यादीत असलेल्या कंत्रटदाराना कामे देणार तर कामे निकृष्ट नाही तर काय होणार असे कदम यांनी सांगितले. 

खासदार श्रीकांत शिंदे हे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे, नवीन गवळी यांच्यासोबत आज चार वाजता चक्कीनाका येथे पोहचले. त्याठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्याची तपासणी केली असता प्रथमदर्शी वापरण्यात येत असलेली गिरीट त्यात माती मिश्रित होती. माती मिश्रित गिरीट टाकल्याने ती एका पावसाच्या सरीत वाहून जाते. त्यामुळे बुजविलेले खड्डा हा पुन्हा उघडा पडतो. महापालिकेच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश केला आहे. 19 सप्टेंबर रोजी खासदार शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली होती.                        त्यावेळी आयुक्तांनी 2 सप्टेंबरपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे  आश्वासन दिले होते. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोपही शिंदे यांनी आयुक्तांच्यासोबत पार पडलेल्या बैठकी दरम्यान केला होता. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे सुरु झालेली आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी चक्कीनाका येथे अचानक खासदार शिवसेना नगरसेवकांसोबत पोहचले. यावेळी मातीमिश्रित गिरीटचा वापर करुन खड्डे बुजविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काम सुरु आहे. त्याठिकाणी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नाही. तसेच संबंधित कंत्राटदारही त्याठिकाणी उपस्थित नाही. निकृष्ट दर्जाची कामे करुन जनतेच्या पैशाची नासाडी सुरु आहे. आयुक्त वेलरासू हे कार्यालयाच्या बाहेर निघत नाहीत. कार्यालयात बसूनच काम करीत आहे. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी हे देखील कार्यालयात बसून काम करीत आहेत. ठाण्यात कामे सुरु आहेत. ठाण्यातील आयुक्तांचा आदर्श वेलरासू यांनी घ्यावी असे शिंदे यांनी सांगितले