शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बरोरा यांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांनी केला विरोध; निष्ठावंत नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:37 IST

जर तुम्ही ‘मातोश्री’चा आदेश पाळता, तर उद्या तेथूनच बरोरा यांचे नाव जाहीर झाल्यास काम करणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘मातोश्री’चा हा निर्णय नसून पक्षश्रेष्ठी आमच्यापैकीच एकाचे नाव जाहीर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

भातसानगर : आयारामांना तिकीट न देता पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. पांडुरंग बरोरा यांना तिकीट दिल्यास आम्ही अजिबात काम करणार नाही, असा निर्धार नाराज शिवसैनिकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे.

माजी आमदार दौलत दरोडा, तालुका संघटक चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर तळपाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा जाधव, राजेंद्र म्हसकर, अविनाश शिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही निष्ठेने काम करू, असे यावेळी त्यांनी सांगितले.

जर तुम्ही ‘मातोश्री’चा आदेश पाळता, तर उद्या तेथूनच बरोरा यांचे नाव जाहीर झाल्यास काम करणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘मातोश्री’चा हा निर्णय नसून पक्षश्रेष्ठी आमच्यापैकीच एकाचे नाव जाहीर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ, नाकर्ते तालुकाप्रमुख मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करून चंद्रकांत जाधव यांनी तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांच्यावर शरसंधान साधले.

महिनाभरापूर्वीच झालेल्या एका बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावात बरोरा यांना पक्षात घेऊ नका, असे ठरलेले असताना केवळ धिर्डे हेच त्यांना घेऊन फिरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ज्यांनी १९८० पासून आम्हा शिवसैनिकांवर अन्याय केला, मारहाण केली, हे शिवसैनिक आजही विसरले नसल्याची पुष्टी यावेळी जोडण्यात आली. त्यामुळे हेच उद्या शिवसेनेची राष्ट्रवादी करतील, अशी शक्यता या नाराज गटाने वर्तवली. जो कुणी पक्षाच्या विरोधी भूमिका स्पष्ट करेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे काही दिवसांपूर्वी धिर्डे यांनी स्पष्ट केले होते. आता या पाच जणांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.आमिषाला बळी पडणार नाहीविधानसभेसाठी उमेदवारीऐवजी एखादे महामंडळ किंवा विधान परिषदेचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले, तरी मी त्याला बळी पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार दौलत दरोडा यांनी घेतली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना