शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 20:05 IST

उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली.

उल्हासनगर- महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यानंतर शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी पत्रकारांना दिली. (shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development)उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या साई पक्षाला सोबत घेण्यासाठी शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून रविवारी सायंकाळी ५ वाजता शिंदे यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरींसह साई पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन, पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी दोघांनी शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. 

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून साई पक्ष हा शिवसेनेसोबत आल्यास पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. महापालिकेत यापूर्वी दोन वेळा शिवसेना-साई पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. यावेळी साई पक्षाने लिलाबाई अशान व आशा इदनानी असे दोन महापौर दिल्याची माहिती जीवन इदनानी यांनी दिली. यापुढे दोन्ही पक्ष शहरविकासासाठी एकत्र राहणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना-साई पक्षाच्या चर्चे वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नगरसेवक तसेच साई पक्षाकडून जीवन इदनानी, पक्षाचे गटनेते गजानन शेळके, नगरसेवक ज्योती चैनांनी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.

खासदारांनी घेतला बेडमिंटनचा आनंद -शिवसेना-साई पक्षाची चर्चा झाल्यानंतर, खासदार शिंदे यांनी इंदिरा गांधी गार्डनची पाहणी केली. गार्डनच्या बॅडमिंटन कोर्टवर काही तरुण खेळत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही बेडमिंटनचा आनंद घेतला.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे