शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू; शिवसेना आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:24 IST

लॉज व बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी 

मीरारोड- मीरा भाईंदरमधील लॉज हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले असून यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. अशा लॉजसह ऑर्केस्ट्रा बार व बार हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करा, त्यांचे परवाने रद्द करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांना भेटून केली. गांधी जयंती आधी ही कारवाई करावी अन्यथा समाजाच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे . 

शहराच्या वेशीवर स्प्रिंग लॉजिंग व बोर्डिंग, साई सनिधी बार,  बेकयार्ड बीअर गार्डन, आर ब्रीविंग कंपनी पासून उत्तनच्या सिल्वर डोअर, युटर्नपर्यंत अनेक लॉज - बारची बेकायदेशीर बांधकामे आहेत. अंतर्गत बेकायदा बांधकामे झाली या असून छुप्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील लॉज, ऑर्केस्ट्रा बार यामुळे गैरप्रकार वाढले आहेत. लॉजच्या आड अनैतिक व्यवसाय वाढले असून यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे असे सरनाईक म्हणाले. 

कोरोनाच्या संसर्ग काळात तर बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचाशी अर्थपूर्ण व्यवहार करून ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ही बांधकामे झाली आहेत, त्या अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे. गेल्या ५ महिन्यांत झालेली ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महापालिकेने कालबद्ध मोहीम आखून सर्व बांधकामे तात्काळ तोडून टाकावीत. या  महिन्यातच ही मोहीम पूर्ण करावी. 

तरुण पिढीला वाईट मार्गाला लावणारी ही अनैतिक व्यवसायाची केंद्रे असून पालिकेने प्रामाणिकपणे यावर कारवाई करावी व भविष्यात अशी अनैतिक व्यवसाय केंद्रे परत उभी राहणार नाहीत अशी कडक अंमलबजावणी करावी.मुंबईतील कमला मिल कमपाउंड येथील एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीनंतर मीरा भाईंदर महापालिकेनेही अनेक हॉटेल, रेस्टोरंट, बार, लॉजिंग, बोर्डिंग यांना नोटीसा पाठविल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पूर्णपणे अनधिकृत व विनापरवाना व्यवसाय करत असलेल्यांवर मनपा प्रशासन मेहेरबान आहे का ? असाही प्रश्न आहे.

लॉजिंग - बोर्डिंग - लेडीज बारची बांधकामे करताना त्यात दाटीवाटीने बांधकामे केली गेली आहेत. कोणतीच अग्निसुरक्षा यंत्रणा तेथे नाही. कोणत्याही लॉजिंग - बोर्डिंग व बारला परवानगी देऊ नये असे असे सरनाईक यांनी म्हटले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना भेटून आ. सरनाईक यांनी उपरोक्त मागणी केली व निवेदन दिले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpratap sarnaikप्रताप सरनाईक