शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:13 IST

दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला.

बोर्डी : तलासरी तालुक्यातील वेवजी गावचे बेपत्ता हॉटेल व्यावसायिक आणि शिंदेसेनेचे स्थानिक नेते अशोक रमण धोडी (वय ५२, रा. वेवजी, काटीलपाडा) यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना शुक्रवारी यश आले. गुजरातमधील भिलाडच्या सरीगामच्या मालाफलिया येथील दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला. त्यांचा सख्खा छोटा भाऊ अविनाश याने साथीदारांसह हा गुन्हा केला असून, तो फरार आहे.

गुन्ह्यातील चार संशयित अटकेत असून, आणखी दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. परंतु, मुख्य आरोपी पसार झाला आहे. उर्वरित आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत अविनाश धोडी आणि अन्य साथीदारांनी अशोक यांचा खून करून मृतदेह गुजरातमधील सरीगाम येथील निर्जनस्थळी दगडखाणीत पाण्यात फेकल्याची कबुली दिली.

२० जानेवारीपासून बेपत्ताशुक्रवारी पालघर पोलिस आणि गुजरात पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली. दोरीला लोहचुंबक बांधून ४५ फूट खोल पाण्यात फिरवल्यावर कार आतमध्ये असल्याचे समजले. दोन हायड्रा आणि दोन गोताखोरांच्या मदतीने कार बाहेर काढली. डिकीत मृतदेह आढळल्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कौटुंबिक वादासह अन्य  कारणांतून हा खून झाला असून, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर गुन्ह्याचा खुलासा होईल, असे पाटील यांनी सांगितले. २० जानेवारीपासून अशोक बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी घोलवड पोलिसात दिली होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना