शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे-फाटक गटातील नेते भिडले, एकमेकांना शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:28 IST

ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेतील अंतर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. असे असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यात शिंदे-फाटक गटातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि नम्रता फाटक आणि राजू फाटक हे एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला. एकमेकांना शिवीगाळ करत त्यांच्यात झटापट झाल्याची चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल होत आहे

विकास रेपाळे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर, राजू फाटक हे आमदार रवी फाटक यांचे बंधू आहेत. यामुळे शिंदे आणि फाटक गटातील वाद चव्हाट्यावर आला आहेत. रहेजा येथील मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली शहर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून, या कामावरून दोन दिवसांपूर्वी सदर वाद झाला आहे. वाद एवढा विकोपाला गेला की, त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात झटपटही झाली. या वादाची चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेनेचा अंतर्गत वाद असल्याने आम्ही तो मिटवू,, एकनाथ शिंदे जो निणर्य घेतील तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया आमदार रवी फाटक यांनी दिली आहे.

माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि नम्रता फाटक यांच्या गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. राज्यात जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०१७ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले. १९८६ ते २०१७ या काळात ठाणे महापालिकेच्या सात निवडणुका झाल्या. ३१ वर्षांत २४ वर्षे पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आजवर कोणत्याही एका राजकीय पक्षाला एकदाही निर्विवाद बहुमत मिळाले नव्हते. मात्र २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे