शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खोटी आश्वासने देत नाही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 03:43 IST

सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन : कल्याणमध्येही हवाई रिक्षा सुरू करण्याची केली घोषणा

कल्याण : शिवसेना कधीही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करुन दाखवितो, असा टोला शिवसेनेचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी भाजपाला लगावला. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर कल्याणच्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी हवाई रिक्षा सुरु करण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरीपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर उपेक्षा भोईर, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना खोटी आश्वासने देत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही. जे कराल तेच सांगा असे बजावले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर ते काम कुठपर्यंत आले. त्याची पूर्तता झाली की नाही यावर आम्ही नजर ठेवून असतो. दोन निवडणुकींच्या मधल्या काळात अनेक पक्ष राजकारण करीत असतात. शिवसेना मात्र दोन निवडणुकीच्या मधल्या काळात जनतेला दिलेली वचनपूर्ती करण्यावर लक्ष देते. समाजकारणाचा वसा शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिला आहे. मी आत्ता २८ वर्षाचा असलो तरी माझ्या ५० व्या वर्षी गाव, शहरे, राज्य आणि देशातील विकासाची स्थिती काय असेल. याचा विचार करतो.रिंगरोडचे काम लवकर व्हावे - पालकमंत्रीच्पालकमंत्री शिंदे म्हणाले की, सिटी पार्क हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रॉजेक्ट आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. सिटी पार्कसोबतच कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी पक्षप्रमुखांनी जातीने लक्ष दिले आहे.च्कल्याणमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आयुक्त बोडके यांनी रस्ते रुंदीकरण हाती घ्यावे. त्यासाठी पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. कल्याणच्या वाहतूककोंडीवर रिंगरोड हा रामबाण उपाय आहे. या रिंगरोडचे काम जलद गतीने मार्गी लावण्याचे आवाहन त्यांनी केले.ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाचा निधीकार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार आहे का, अशी विचारणा काहींनी केली असली तरी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी युती कटीबद्ध आहे. या विकासात ठाकरे कुटुंबीयांचे योगदान असले तरी त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला आहे. याठिकाणी शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. तरीसुद्धा विरोधक गाजर दाखवल्याचे आंदोलन करतात, असा टोला भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी लगावला. त्यांच्या भाषणानंतर आदित्य म्हणाले की, शिवसेना भाजपामध्ये मध्यस्थी करायची असेल तर कल्याणच्या नरेंद्र पवारांनाच सांगायला हवे. आदित्य यांच्या या टिप्पणीवर हास्याची लकेर उठली.

अंबरनाथमध्ये शूटिंग रेंजचे उद््घाटनअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने तयार केलेल्या फिश मार्केट, बहुउद्देशीय इमारत आणि शूटिंग रेंजचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. अंबरनाथमध्ये दहा, २५ आणि ५० मीटर असे तीन रेंज उभारले आहेत. वरळी वगळता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असे रेंज नसल्याचे मत आदित्य यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आमदार बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेAditya Thackreyआदित्य ठाकरे