शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कारिवली गावांत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:04 IST

भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापत असताना कारिवली गावांत झालेल्या हाणामारीने पोलिसांची जबाबदारी वाढविली आहे. तालुक्यातील कारिवली गावांत वैभव पाटील व त्याचे भाऊ गावातील काही लोकांबरोबर राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसले असताना तेथे शिवसेनेचे उमेदवार गोकूळ नाईक हे आपल्या साथीदारांसोबत आले आणि कंपाऊंडमध्ये बसलेल्यांच्या अंगावर दगडविटांचा मारा करीत ‘तुमच्यात किती दम आहे,’ असे म्हणत मारहाण केली.या मारहाणीत वैभव पाटीलसह त्यांचा भाऊ जतीन पाटील, मित्र स्वप्नील पंडित नाईक, राहुल पाटील असे पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैभव पाटील याने भोईवाडा पोलीस ठाण्यात शिवसेना उमेदवार गोकूळ नाईकसह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मोहीत शिवाजी पाटील याने छत्रपती पाटील यांच्या घरासमोर निवडणुकीचा राग धरून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे कारिवली गावांतील वातावरण तंग झाले असून भोईवाडा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडी