शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा आमने-सामने; दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:14 IST

रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे.

डोंबिवली : रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे. फेरीवाल्यांना हटवून शिवसेनेने दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप भाजपाचे कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी करत फेरीवाल्यांसह सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास केडीएमसीने न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई केली आहे. त्यामुळे बाहेरील हद्दीत व्यवसाय करण्यावरून सध्या फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केडीएमसीच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असताना हद्दीच्या बाहेर फेरीवाल्यांना हुसकावून शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांनी दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप जाधव यांचा आहे. या दिवाळीच्या स्टॉलमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघर्ष घडवून आणणाºयांचा बंदोबस्त करा, अशी मागणी जाधव यांची आहे. स्वामिनारायण मंदिर ते रामनगर पोलीस ठाणे, असा मोर्चा काढण्यात आला. फेरीवाले व भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.‘त्यांना’ हुसकावलेले नाही - वैशाली दरेकर-राणेदिवाळीचे केवळ १० दिवस महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. तेथील फेरीवाल्यांना थोडेसे मागे सरकायला सांगितले आहे. त्यांच्या व्यवसायाला बाधा आणलेली नाही.त्यामुळे आम्ही अन्याय करतोय आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. सात ते आठ वर्षांपासून शिवसेनेकडून येथे स्टॉल लावले जात आहेत.आधी कोणाला अडचण नव्हती, पण आताच का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाजपाची भूमिका काय?आॅगस्टमध्ये हद्दीच्या बाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हुसकावून लावले होते. यावेळी त्यांनी घेतलेला आक्रमकपवित्रा चर्चेचा विषय ठरला होता. यात काही दिवस फेरीवाला संघटनेच्या नेत्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. शहराच्या बाहेरून येऊन फेरीवाले दादागिरी करत असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.सोमवारी भाजपाचेच पदाधिकारी असलेले जाधव हे मात्र हद्दीच्या बाहेर बसणाºया फेरीवाल्यांच्या बाजूने होते. त्यांनी काढलेल्या मोर्चात चव्हाण यांनी हुसकावून लावलेले फेरीवालेही सहभागी झाले होते तसेच काही फेरीवाले अतिक्रमणाविरोधात उपोषण छेडणारेही भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणेDiwaliदिवाळी