शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना व भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

आधी पुनर्वसन मगच धरण; मोबदला न मिळाल्यास काम सुरु करु देणार नसल्याचा घेतला पवित्रा

विक्रमगड : तालुक्यातील साखरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये देहर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, अजून पर्यत पुनर्वसनाचा मार्ग न निघाल्याने हे काम बंद करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनाभाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन काम बंद केले. जो पर्यत योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यत हे काम सुरू करायचे नाही असा पवित्रा आदोलकानी घेतला.या साखरे ग्रामपंचायत हद्दीतील व खुडेद हद्दीतील २७५ कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न रेगाळला आहे. यासाठी आधी पुनर्वसन मगच धरण अशी मागणी आहे. या प्रकल्पात कुंडाचापाडा, महालपाडा, तसेच हनुमानपाडा, पवारपाडा यागावाचा पुनवर्सनाचा ८ प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पात अनेकाची घरे जातात तर काहीची जमिनी जातात यासाठी योग्य सर्व्हेक्षण करून योग्य माबदल दयावा तसेच कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आदोलनात भाजप शिवसेनेचे राजकीय मंडळी एकत्र आली. यामध्ये कोकण पांटबधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदिश धोंडी, प्रकाश निकम जिल्हापरिषदसदस्य, सागर आळशी, महेश आळशी , योगेश भानुशाली, आदी जण उपस्थित होते. या बाबत अजून कोणताच ठोस निर्णय झाला नसुन याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे बैठक लाऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदोलन कत्याँनी सांगितले पंरतु अधिकारी मात्र काहीच सागू शकले नाही

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDamधरण