शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शिवसेना नेहमी संघर्षातून उभी राहते, आता गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ : राजन विचारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 06:51 IST

शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून, आपल्यासारख्या शिवसैनिकांच्या रूपाने नवी पालवी फुटली असल्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले.

ठाणे : ‘गेले ते कावळे, उरले ते मावळे’ यावर आमचा विश्वास असून, शिवसेना ही नेहमी संघर्षातूनच उभी राहते. त्यामुळे खचून जाऊ नका. शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून, आपल्यासारख्या शिवसैनिकांच्या रूपाने नवी पालवी फुटली असल्याचे शिवसेनेचे  खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे.  आता गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असा निर्धार विचारे यांनी व्यक्त केला. 

शिवसेनाठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा विभागीय मेळावा नुरी बाबा दर्गा रोड येथील अनुराधा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शहरप्रमुख प्रदीप शिंदे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या प्रभागातील मतदार यादी अत्यंत बारकाईने चाळून  घ्या, नागरिकांशी थेट संवाद करायला सुरुवात करा, असे विचारे यांनी सांगितले. 

रोजगार काढून घेण्याचे काम शिवसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून भगवा नेहमीच उंचावत ठेवला, त्यांच्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिला; परंतु काही स्वार्थी राजकारण्यांनी सेनेसोबत घात करून सत्ता मिळवली.ठाण्याच्या शिवसेनेला गद्दारीचा डाग लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेना सोडून गेलेले महाराष्ट्रातील उद्योगधंदे भाजपच्या सोबतीने गुजरातला पाठविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपल्याकडील रोजगार काढून घेण्याचे घाणेरडे काम सध्या, या महाराष्ट्रात सुरू आहे, असेही विचारे म्हणाले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे