ठाणे : ठाण्यात शिंदेसेना ८७ आणि भाजप ४० जागांवर लढत असली तरी कळवा, मुंब्र्यातील भाजपचा जनाधार नसलेल्या नऊ जागा शिंदेसेनेनी भाजपच्या गळ्यात बांधल्याने जागा वाटपात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची भाजप नेत्यांची भावना आहे. जागावाटपात अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत. त्याबाबत खूप वेदना आहेत; पण व्यापक हित महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आ. संजय केळकर यांनी दिली. त्यामुळे प्रत्यक्षात भाजपची ठाण्यात ३१ जागांवर बोळवण केल्यासारखे आहे.
भाजपच्या यादीमध्ये २३ नवीन चेहऱ्यांचा समावेशकमी जागा मिळाल्याच्या मुद्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. काही ठिकाणी भाजपचे उमेदवार कमकुवत असल्याने ठाण्यात शिंदेसेनेच्या जागा वाढण्यास हातभार लागणार आहे. भाजपने आपल्या ४० उमेदवारांची यादी जाहीर केली.
या यादीत २३ नवीन चेहरे दिले आहेत. युतीमध्ये भाजपला हव्या तशा जागा या मिळालेल्या नाही. भाजपने ५५ जागांची मागणी केली होती. सरतेशेवटी भाजपच्या वाट्याला ४० जागा आल्या. शिंदेसेनेने आपल्या वाट्याच्या जागा भाजपला सोडल्या नाही. मुंब्रा, कळवा या भागातील नऊ जागा भाजपला देण्यात आल्या.
भाजपचे प्राबल्य नसलेल्या मुंब्य्रात सातच्या आसपास जागा दिल्या. शिंदेसेनेनी मुंब्य्रात चार जागा या मुंब्रा विकास आघाडीला सोडल्यात.
सर्व १३१ प्रभागांत उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती; पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजूत काढली आहे. महायुती आणि व्यापक हित लक्षात घेऊन या बाबी स्वीकाराव्या लागतात. संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे
Web Summary : BJP leaders feel shortchanged as Shinde Sena allocated them unwinnable seats in Thane. Despite internal discontent over fewer seats, BJP prioritizes the alliance. They received 40 seats, including nine challenging ones.
Web Summary : ठाणे में शिंदे सेना द्वारा भाजपा को कम सीटें मिलने से भाजपा नेता निराश हैं। गठबंधन को प्राथमिकता देते हुए, भाजपा ने 40 सीटें स्वीकार कीं, जिनमें जीतने में मुश्किल सीटें भी शामिल हैं।