शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:01 IST

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला.

ठाणे : भाजपचे वागळे इस्टेट मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ठाण्यातील भाजपचे जाधव यांच्यावर शिंदे गटाचे नगरसेवक रेपाळे आणि त्यांच्या नऊ ते दहा कार्यकर्त्यांनी कशिश पार्क येथे जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३० डिसेंबर २०२२ रोजी घडली. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला. याच वादातून रेपाळे यांच्यासह नऊ ते दहाजणांच्या गटाने जाधव यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या मारहाणीच्या घटनेनंतर ठाणे जिल्हा भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि रूपाली रेपाळे  यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. 

हत्यारे जप्त करणे बाकी 

बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, पोलिसांनी आरोपींचा ताबा घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच हल्ल्याच्या वेळी त्यांनी वापरलेली हत्यारे जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे तसेच फिर्यादीचे वकील ॲड.  मकरंद अभ्यंकर आणि ॲड. सुरेश कोलते यांनी न्यायालयात केली. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रेपाळे यांच्यासह तिघांचाही अर्ज फेटाळला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस