शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:25 IST

शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे . 

धीरज परब 

मीरारोड - ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात भाजपाचाच आमदार करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे, युतीबिती डोक्यातून काढून टाका असे फडणवीस सांगत आहेत. जे काय व्हायचे ते होईल असा दावा भाजपाचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे प्रभारी मनोहर डुंबरे यांनी केला आहे. भाजपच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचा मतदार संघ हिसकावून घेण्याची भाषा भाजपा नेत्याने फडणवीस यांचे नाव पुढे करत केल्याने राजकीय वर्तुळात त्याचे पाडसाद उमटण्याची शक्यता आहे.  

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच किशोर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा हे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे समर्थक मानले जातात . गेले काही वर्ष जिल्हाध्यक्ष पद आपल्या मर्जीतले नसल्याने नाराज असलेले मेहता शर्मा यांच्या नियुक्तीनंतर आनंदी झाले असून त्यांनी मीरारोड मध्ये शर्मा यांच्या सत्काराचा मेळावा ठेवला होता. या मेळाव्यात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मीरा भाईंदर भाजपाचे प्रभारी जयप्रकाश ठाकूर, ओवळा माजिवडा १४६ मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी मनोहर डूंबरे आदी उपस्थित होते . शर्मा यांच्या नियुक्ती निमित्त मेहतांनी आपले शक्ती प्रदर्शन केले . 

यावेळी मनोहर डुंबरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात भाजपाचाच आमदार करायचा आहे . देवेंद्रजी यांचे स्वप्न आहे. ह्या मतदार संघात नगरसेवक भाजपाचे जास्त असल्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी मांडला. ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात आमदार प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यात ठाणे व मीरा भाईंदरचा काही परिसर येतो. राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे सरकार येऊन मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला आहे . त्यानंतर आता भाजपाच्या डुंबरे यांनी थेट फडणवीस यांचा हवाला देऊन युतीचा विचार डोक्यातून काढून टाका सांगत शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे . 

आमदार गीता जैन यांना सुद्धा भाजपा धक्का देणार का ? मीरा भाईंदर मतदार संघात सुद्धा भाजपाचा आमदार हवा असे सांगत नरेंद्र मेहतांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा दुप्पट मतांनी त्यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे असे देखील डुंबरे यांनी भाषणात म्हटले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेले मेहता हे सतत वादग्रस्त ठरल्याने २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाच्याच बंडखोर गीता जैन यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून देत  मेहतांना पराभवाची धूळ चारली होती. आमदार झाल्यावर त्या भाजपा सोबत गेल्या मात्र मेहतामुळे त्यांनी शिवसेनेचे कास धरली. राज्यात शिंदे सरकार आल्यावर त्या पुन्हा भाजपा सोबत आल्या आहेत.परंतु डुंबरे यांनी मीरा भाईंदर मतदारसंघातून मेहतांची एकप्रकारे उमेदवारीच जाहीर केल्याने आ. जैन यांच्या बाबत भाजप नेतृत्व यांची भूमिका वेगळी असल्याची बाब समोर आली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpratap sarnaikप्रताप सरनाईक