शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम, अभिनेत्री उषा नाईक यांना गंगा जमुना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 02:12 IST

साहित्य, सिनेनाट्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

ठाणे : प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार, तर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री उषा नाईक यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामिगरीबद्दल प्रशांत डिंगणकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखिनय कामिगरी केल्याबद्दल बाळासाहेब खोल्लम तर लक्षवेधी कलावंत माधुरी करमरकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांयकाळी ५ वाजता होणाºया जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आ. प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, अ‍ॅड.निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार 

शरद पोंक्षे यांना देण्यात येणाºया पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणाºया उषा नाईक यांच्याही पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल डिंगणकर यांना तर शैक्षणिक क्षेत्रातील कामिगरीबद्दल खोल्लम आणि लक्षवेधी कलाकार म्हणून माधुरी करमरकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना रोख रक्कम २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र