शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 14:01 IST

Sharad Pawar on Thane | मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घडला दुर्दैवी अन् संतापजनक प्रकार

Sharad Pawar on Thane hospital tragedy 17 dead: ठाण्यात उपचाराअभावी महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर, आता अधिकच धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर येत असतानाच, आता एकाच रात्रीत सुमारे १६-१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि कर्मचारी क्षमता तसेच रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकाच रात्रीत या अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. यातील १३ रुग्ण हे ICU मधील, तर चार रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. दरम्यान, या रुग्णांना आजारपणाच्या शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

"ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले.

एका रात्रीत १७ रूग्ण दगावल्याच्या वृत्ताला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० ऑगस्टला  एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री यांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्री यांची ठाणे महानगरपालिका, ठाणे महापालिकेत २५ वर्षांपासून सेनेची सत्ता आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेSharad Pawarशरद पवारhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूEknath Shindeएकनाथ शिंदे