शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत - आव्हाड

By जितेंद्र कालेकर | Updated: December 1, 2023 19:26 IST

पवार साहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती, असेही असे आव्हाड म्हणाले.

ठाणे : तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निमार्ता शरद पवार हेच आहेत. हे अख्या जगाला माहित आहे. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अजित पवार यांच्यावर केली. ठाण्यात पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. ज्यांनी तुम्हाला घडवले, त्यांच्यावर बोलता, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. हा पक्ष त्यांना दावणीला लावायचा होता, दुसर्या पक्षात विलीन करायचा होता. पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते, असाही गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.

मी कोणाला विचारुन आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांची आहे, असे कोणीही सांगेल. माझं आंदोलन शरद पवारसाहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नसल्याचा दावा त्यांनी केला.

यासाठी हवा होता शरद पवार यांचा राजीनामा -शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. ते जर बारामतीतून निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय? तुमचं प्लॅनिंग कधीपासून होते, हे स्वत: विचार करा. पाच वर्ष पवार साहेबांचे डोके कोणी खाल्लं?भाजपसोबत चला हे कोण कोण सांगायचे, याचे चिंतन करा.

... म्हणून बाप होता येत नाही शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून सत्तेत यायचे, हे आपल्या हवे होते. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. काकाच्या पाठीत सुरा कोणी भोसकला, स्वत: च्या ताईला त्रास कोणी दिला, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.

महाराष्ट्राने सावध राहावे - आव्हाड आपल्याकडे पण निवडणुका लागल्या की सर्व स्वस्त होईल. निवडणुका झाल्या की परत महाग होईल. त्यामुळे महाराष्ट्राने सावध राहावे , असा सल्लाही आव्हाड यांनी दिला. पवार साहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती, असेही असे आव्हाड म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस