शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,४ पिस्टल बी एम डब्लू कार जप्त

By नितीन पंडित | Updated: May 31, 2025 21:06 IST

शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या.

नितीन पंडित

भिवंडी: शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याजवळ एक महागडी बीएमडब्ल्यू कार दोन गावठी कट्टा, दोन पिस्टल असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

      शोएब शाहीद शेख,वय २३,नौशाद मक्सुद आलम खान, वय २२,अफताब अफसर शेख,वय २१,सर्व रा.दरभंगा बिहार व शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी, वय २० वर्षे,रा.शानदार मार्केट अशी अटक आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदाना जवळ रस्त्याच्या बाजुला पाच व्यक्ती त्यांचे सोबत हत्यारे व पिस्तूल घेवून दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांच्यासह पोनि (गुन्हे) अतुल अडूरकर,पोनि (प्रशासन) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे,सहा. पोलीस निरीक्षक योगेश गायकर,पोलिस कर्मचारी रिझवान सैय्यद,निलेश महाले,लक्ष्मण सहारे, प्रशांत बर्वे,रोशन जाधव,दिपक सानप, भुषण पाटील यापथकाने घटनास्थळी धाव घेत रस्त्या लगत उभ्या असलेल्या संशयित बी एम.डब्लू कार जवळ जात असताना कार चालकाने कार पळविण्याचा प्रयत्न केला.

 पोलिसांनी पाठलाग करून बी एम डब्लू कार थांबविली असता अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला तर कार मधील शोएब शाहीद शेख,नौशाद मक्सुद आलम खान,अफताब अफसर शेख,शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेवून त्यांच्या कार ची झडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन देशी बनावटीचे कट्टे, दोन देशी बनावटीचे पिस्टल,एक लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड,तीन कपड्‌याचे मास्क, मिरची पुड,एका पिशवी मध्ये सफेद रंगाचे ४ जोड हॅन्डग्लोज, चाकु,सेलो टेप,मोबाईल व एक बी.एम.डब्ल्यु कार  असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रूपये किंमती च्या मुद्देमालासह चार आरोपी यांना दरोडा घालण्याचे तयारीत असतांना अटक केली.

 आरोपींना शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही आरोपींना ४ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून हे आरोपी नक्की कोठे दरोडा टाकणार होते व त्यांनी अजून कोणते गुन्हे केले आहेत या बाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे हे करीत आहेत.