शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:23 IST

यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.  जिल्ह्यातील सुमारे १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा आंदाज आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, यांनी सुमारे सहा कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चास मंजुरीही देखील दिली आहे. त्यात शहापूरचे ७८ गावे, १९० पाड्यांना पाणी टंचाई असून त्यातील ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी ९० लाखांची तरतूद आहे. तर पाणी पुरवठ्याच्या अन्य कामांसाठी शहापूर तालुक्याला चार कोटी ११ लाखांच्या निधीची तजवीज करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकमतने ‘४४८ पाड्यांना पाणी टंचाई ‘ या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनास जागृत केलेत्वरीत दखल घेऊन जिल्हाप्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरूकाही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांना, याशिवाय मुंबईला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांना, याशिवाय मुंबईला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आहे. सुमारे दहा गांवे ३० पाडे आदी ४० गावखेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून त्यांना १३ टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. परंतु संपूर्ण दुर्गमभाग असलेल्या या शहापूर तालुक्यातील ७८ गावे आणि १९० पाड्यांमध्ये कमी अधिकप्रमाणात पाणी टंचाई सुरू असल्याचे स्थानिकांकडून उघडकीस येत आहे.यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील काही गावपाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या टंचाईची चाहूल लागताच लोकमतने ‘४४८ पाड्यांना पाणी टंचाई ‘ या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनास जागृत केले आहे. याची त्वरीत दखल घेऊन जिल्हाप्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरू केल्याचे निदर्शनात आले. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मात्र शहापूरच्या १० मोठ्या गावांसह ३० आदिवासी पाड्यांच्या तीव्र टंचाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर वेळीच उपाययोजना म्हणून १३ टँकरव्दारे २४ तास पाणी पुरवठा सुरू आहे. शहापूरमधील अजनूप, गोलभण, दाड, जरडी, उम्रावण, कळभोंडे, विहीगांव, माळ, पाटोळ आणि घाणेपाडा या दहा मोठ्यांनासह ३० पाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये कोळीपाड, बिवळवाडी, नारळवाडी, पारधवाडी, आंब्याचापाडा, बोरीचापाड, पेट्याचापाडा,ओहळाचीवाडी, वरातेपाडा, कडूपाडा, भाकरेपाडा, चाफ्याचापाडा, वडपाडा, वडाचापाडा, काटीपाडा, नवीनवाडी, सावरवाडी,मेंगाळपाडा, भस्मेपाडा, चिंतामणवाडी, बोंडारपाडा, ठाकूरपाडा,जांभूळपाडा, राईचीवाडी, काळीपाडा, कुंभईवाडी, सुगाव आणि वारलीपाडा या दुर्गमभागातील गावखेडे तीव्र टंचाईला तोंड देत आहेत. त्यावरील उपाययोजना म्हणून ३० टँकर या ४० गावखे्यांना रात्रंदिवस पाणी पुरवठा करीत आहेत. काही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे. त्यातून महिला वर्ग पाणी काढून कुटुंबाची तहाण भागवत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यात आहे. मागील वर्षी या शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा मात्र ही संख्या वाढण्याचे चिन्ह दिसत आहे. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार