शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर उपजिल्हा रुग्णालयच सलाईनवर, डॉक्टरांअभावी रूग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:10 IST

ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

- वसंत पानसरेकिन्हवली  - ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहापूर उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी येत असतात. त्यांना डॉक्टर व पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आपले हात वर करत पुढील उपचारासाठी पुढे पाठविले जाते.शहापूरमध्ये असलेले पूर्वीचे ग्रामीण रु ग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा नावाने नव्याने सुरु करण्यात आले. यासाठी १०० खाटांचे असलेल्या या रूग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असते. आज या रूग्णालयाचा गाडा फक्त सहा डॉक्टर हाकत आहेत. पण उपजिल्हा रु ग्णालयात आजमितीस स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत. यामुळे प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर कल्याण - ठाणे येथे या रु ग्णांना हलवावे लागते. बालरोग तज्ज्ञ नसल्याने बाळांच्या प्रकृतीची हेळसांड होत आहे.हाडरोग तज्ज्ञ कधी रजेवर असतात त्यामुळे गंभीर रु ग्णाला खाजगी ठिकाणी हलवावे लागते. १०८ रूग्णवाहिकाची सुविधा ढेपाळल्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णवाहिका करावी लागते. सोनोग्राफीसारखीअद्ययावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने तेही बंद आहे. हीच परिस्थिती सिटी स्कॅन मशीनची आहे.१०८ रूग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर२२ नोव्हेंबरला शहापूर तालुक्यातील कृष्णाचीवाडी येथील आर्यन पांडुरंग पारधी या एक वर्षाच्या मुलावर बालरोग तज्ज्ञ नसल्याने योग्य उपचार न झाल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हील रूग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रूग्णाच्या वडिलांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मागणी केली.परंतु सध्या उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचारी यांनी खाजगी रु ग्णवाहिकामधून जाण्यास सांगितले. जवळ पैसे नसतानाही त्याच्या पालकांनी आर्यनला खाजगी रु ग्णालयात दाखल केले.त्यावेळी या रु ग्णवाहिकाचा प्रश्न उपस्थित झाला.शिस्त, स्वच्छतेत फरक पडलाडॉ. बनसोडे यांनी रु ग्णालय अधीक्षकांचा चार्ज स्वीकारला. अतिशय गलिच्छ असलेल्या रूग्णालयात स्वछता आणि शिस्त या दोन गोष्टीवर भर देत त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.शहरी भागातून ग्रामीण भागात डॉक्टर यायला तयार होत नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. कायम डॉक्टर मिळत नसल्याने गंभीर रूग्णाला ठाण्याला पाठवतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया शहापूरमध्ये होते.- डॉ. कैलास पवार, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलshahapurशहापूरthaneठाणे