शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:26 IST

खासगी क्लासमधून घरी परतणा-या मानपाडयातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगुंगीच्या औषधाचा रुमाल लावून केले बेशुद्धतीन महिन्यांपूर्वीचा प्रकारआरोपीचा शोध सुरु

ठाणे: किती वाजले? असे विचारण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन मानपाडयातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार मनोरमानगर भागात तीन महिन्यांपूर्वी घडला. आधी भीतीपोटी आपल्या कुटूंबियांना तिने हा प्रकार सांगितला नव्हता. ती गरोदर राहिल्याने याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पिडीत मुलगी १ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मनोरमानगर येथील एका खासगी शिकवणीवरुन पायी तिच्या घरी जात होती. त्याचवेळी गुरुकुल हायस्कूलजवळ एका २० ते २२ वर्षीय तरुणाने टाईम विचारण्याच्या बहाण्याने तिच्याशी संवाद साधला. ती काही बोलण्यापूर्वीच त्याने उजव्या हाताने रुमालाने तिचे तोंड दाबले. त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे वाटल्यानंतर त्याने तिला गुरुकूल शाळेजवळील गल्लीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकारानंतर त्याने तिथून पळ काढला. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तपासणीत हा सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार करुन पसार झालेल्या या तरुणाचा आता शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाRapeबलात्कार