ठाणे : घरकाम करणाऱ्या महिलेच्या १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकास श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली.डोंगरीपाड्यातील एक दाम्पत्य २0 मार्च रोजी कामासाठी बाहेर गेले होते. घरी १0 वर्षांची मुलगी आणि तिचा भाऊदेखील होता. भाऊ बाहेर खेळत असताना आरोपी प्रेम शंकर परियार (वय २२) याने टीव्हीवर कार्टून दाखवण्याच्या बहाण्याने मुलीला जवळ बोलावले. आरोपीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला झिडकारून मुलगी त्याच्यापासून दूर झाली. परंतु, पुन्हा रिमोट देण्याचा बहाणा करून आरोपीने तिला जवळ बोलावले आणि तिच्याशी अतिप्रसंग केला. त्यामुळे त्रास होऊन मुलीने आरडाओरड करताच आरोपीने पळ काढला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By admin | Updated: March 28, 2017 03:32 IST