शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार करुन अर्थिक फसवणूक: भोंदू बाबासह त्याच्या पत्नीलाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:56 IST

सासू आणि नणंदेने तुझ्यावर काळी जादू केली आहे, ती उतरविण्यासाठी मी सांगेल तसे कर, असे म्हणत एका ३५ वर्षीय विवाहितेवर गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा नूर आणि हे कृत्य करण्यासाठी त्याला साथ देणारी त्याची पत्नी रुबीना शेख या दोघांना राबोडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन वर्षापासून सुरु होते अत्याचारपत्नीने केले लैंगिक अत्याचाराचे चित्रीचित्रणचित्रीकरणाच्या आधारे वारंवार बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करुन तिची पावणे दोन लाखांची फसवणूक करणारा भोंदू बाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दहीसर पूर्व भागात राहणारी ही महिला तिच्या एका नातेवाईकाच्या ओळखीने ठाण्यातील दुसरी राबोडीतील कोकणी कब्रस्थान, कोळीवाडा भागातील नूर शेख या भोंदूबाबाकडे २०१५ मध्ये नेले होते. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तुमच्यावर काळी जादू झाली आहे, ती उतरविण्यासाठी काही खर्च करावा लागेल, असे सांगून या विवाहितेकडून एक लाख ४८ हजार रुपये घेतले. तर तिच्या आईकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर तुझ्यावर सासू आणि नणंदेने काळी जादू केली असून ती उतरविण्यासाठी नूर बाबा सांगतील तसे कर, असे त्याची पत्नी रुबिना हिने या महिलेला सांगितले. त्यानुसार तो या महिलेवर २०१५ ते नोव्हेंबर २०१८ या तीन वर्षांच्या काळात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करीत होता. तिने या प्रकाराला नकार दिल्यानंतर रुबिनाने आपल्याच पतीने केलेल्या घृणास्पद प्रकाराचे नकळत व्हीडीओ चित्रण केल्याचे सांगून तिला पुन्हा तसेच करण्यास भाग पाडले. हे चित्रण व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी तिच्याकडून आणखी ५० हजार रुपये त्यांनी घेतले. तरीही हा व्हीडीओ व्हायरल करुन या महिलेचा पती, मुले आणि आईला ठार मारण्याचीही धमकी दिली. या भोंदू बाबाने आणि त्याच्या पत्नीन अत्याचाराची परिसीमा गाठल्याने अखेर याप्रकरणी या पिडीत विवाहितेने ३० नोव्हेंबर रोजी राबोडी पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार आणि फसवणूकीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नोव्हेंबर रोजी रुबीनाला तर १ डिसेंबर रोजी नूर शेख याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एम. जे. घाडगे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार