लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरी लावण्याचे अमिष दाखवून १८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेत्याचा अंगरक्षक असलेल्या राजेश ताऊ पाटील (३४, रा. वर्तकनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याने तरुणीवर सभागृह नेत्याच्या महापालिकेतील दालनातही अत्याचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.जवळच्या ओळखीतून ही तरुणी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांचा अंगरक्षक पाटील याच्याकडे आली होती. त्याने तिला नोकरीला लावून देण्याचे प्रलोभन दाखविले होते. यातूनच त्याने आधी वैती यांच्याच अँटीचेंबरमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा करून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने ९ डिसेंबर रोजी विवियाना मॉलजवळ राहणा-या त्याच्या एका मित्राच्या घरी तिला नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तिने थेट सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनाच संपर्क साधून आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर याप्रकरणी तिने ११ डिसेंबर रोजी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलिसांनी पाटील याला १२ डिसेंबर रोजी अटक केली.
ठाण्यात सभागृह नेत्याच्या अंगरक्षकाचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:33 IST
नोकरीला लावण्याचे अमिष दाखवित आपल्याच ओळखीतील तरुणीवर महापालिकेच्या दालनात तसेच मित्राच्या घरी लैंगिक अत्याचार करणाऱ्या राजेश पाटील या राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यात सभागृह नेत्याच्या अंगरक्षकाचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देठाणे महापालिकेच्या दालनातही केला प्रयत्नवर्तकनगर पोलिसांनी केली अटकठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ