शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट, ‘मॅनेजर’ला अटकच चार तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 10:12 IST

घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अँड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती.

‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट, ‘मॅनेजर’ला अटकच चार तरुणींची सुटकाठाणे: घोडबंदर रोड येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८, रा. गोंडा, उत्तर प्रदेश, हल्ली रा. अंधेरी, मुंबई) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अँड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील या स्पामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या पथकाने बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराची खात्री केली. तिथे मागणीनुसार शरीरविक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या तावडीतून या चार मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

असे चालायचे सेक्स रॅकेटया स्पामध्ये संपूर्ण बॉडी मसाजसाठी अडीच हजार रुपये एका ग्राहकाकडून घेतले जायचे. यात तो तयार झाल्यानंतर त्याला खाणाखुणा करीतच आणखी स्पेशल मसाजसाठी खुणवले जायचे. यातही त्याने तयारी दर्शविली की त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली जायची. यातील काही रक्कम या तरुणींना तर काही रक्कम ‘मॅनेजर’कडे वळती केली जात होती. बिनधास्तपणे सुरु असलेल्या या अनैतिक व्यवसायाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हे धाडसत्र राबविले.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटthaneठाणेPoliceपोलिस