शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार; २०१६ नंतर सेवेत रुजु झालेल्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ

By अजित मांडके | Updated: December 12, 2023 16:10 IST

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग ५ डिसेंबर २०२२ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष वेतन आयोग लागू करण्यात आली.

ठाणे :  ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जून २०२३ मध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर पुढील रक्कम टप्याटप्याने देण्यात येईल असे नमुद करण्यात आले होते. परंतु सहा महिने उलटून गेले असतांनाही महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांनी ही थकीत रक्कम अद्यापही मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील थकबाकी देण्याचे मान्य केले आहे. शिवाय २०१६ नंतर महापालिकेच्या सेवेत रुजु झालेल्या कायम कर्मचाºयांना सातवा वेतन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.

ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोग ५ डिसेंबर २०२२ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष वेतन आयोग लागू करण्यात आली. ठाणे  महापालिकेच्या अस्थापनेवर १० हजार ५०० पदे मंजूर झाली असून ६५०० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर, शिक्षण मंडळात दीड हजार कर्मचारी आहेत. १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार ही वेतनश्रेणी लागू करताना जर २०१६ ते २०२१ पर्यंतच्या फरकाची रक्कम द्यायची ठरल्यास तिजोरीवर किमान ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सातव्या वेतन आयोगापोटी पालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी ११४ कोटी ७९ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही सावरलेली दिसत नाही. मात्र आता सातव्या आयोगातील थकीत रक्कम मिळावी यासाठी पालिकेतील कर्मचाºयांनी राजकीय नेत्यांना साकडे घातले आहे.

त्यानुसार आता ही रक्कम तत्काळ अदा करण्याची मागणी म्हस्के यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. याशिवाय या अंतर्गत प्रवासभत्ता, आश्वासित प्रगती योजना व सहाव्या वेतन आयोगापोटी शैक्षणिक भत्ता आदींसह इतर भत्ते देखील अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारात अद्यापही लागू झालेले नाहीत. ते देखील लागू करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. आता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील या बाबत सकरात्मक भुमिका घेतली आहे. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचा फरक अदा करणे निश्चित करण्यात आले आहे.

सातव्या वेतनाच्या आदेशानुसार १ जून २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीचे तीन समान हप्त्यामधील पहिला हप्ता ठाणे महापालिकेतील कार्यरत असलेले व सेवा निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांना प्राधान्याने रोखीने अदा करण्यासही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. शिवाय १ जानेवारी २०१६ ते २१ आॅक्टोबर २०२१ पर्यंत जे अधिकारी, कर्मचारी सेवेत दाखल झाले असतील त्यांना त्यावेळी शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला असता तर त्यांची वेतनश्रेणी कमी होण्याची शक्यता होती. या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या अधिकारी, कर्मचाºयांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे असलेली वेतनश्रेणी संरक्षित करुन या वेतनश्रेणीवर त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असेही आयुक्तांनी नमुद केल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे