शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:35 IST

लग्नाचे प्रलोभन दाखवून एका २३ वर्षीय मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया नविनकुमार तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अत्याचाराच्या कलमांतर्गतसात वर्ष कारावास आणि ३० हजार रुपये दंड तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेमधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी अंतर्गतही दोषी असल्याचे सिद्ध ३५ हजारांचा दंडही ठोठावला३० हजारांची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नविनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही एका वर्षाच्या कारावासाची तसेच ३५ हजारांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रहिवाशी नविनकुमार याचे मागासवर्गीय युवतीसोबत पाच वर्षांपूर्वी प्रेम जुळले होते. हे दोघेही कुर्ला येथील एका कॅटरिंगमध्ये काम करीत होते. तिथेच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून मुंब्रा कॉलनी येथील एका भाड्याच्या घरात ठेवले. पती पत्नीप्रमाणे वास्तव्य करून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्रत्यक्ष लग्नाचे नाव तिने काढल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करीत होता. तेंव्हा तिने त्याच्या खोपोली येथील घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे आपली कैफियत मांडली. त्यांनीही उच्चवर्णीय असल्यामुळे तिच्याशी मुलाचे लग्न लावून देण्यात असमर्थता दर्शविली. अखेर तिने याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे नविनकुमारसह त्याच्या आईवडिलांविरुद्ध तक्रार केली. आयोगाने हे प्रकरण मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केले. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी २०१४ मध्येच तिघांनाही अटक केली. त्यानंतर याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.* आईवडिलांची निर्दोष मुक्तताया खटल्याची १८ जानेवारी २०२० रोजी अंतिम सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीस कडक शिक्षा करण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे तसेच मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी साक्षी पुरावे ग्राह्य मानून नविनकुमार याला लैंगिक अत्याचार कलम ३७६ अंतर्गत सात वर्ष कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडामधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच्या आईवडिलांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे या खटल्याकडे न्यायालयातील वकील, पोलीस आणि पीडितेच्या नातेवाईकांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय