शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा ४८ तासांमध्ये लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 23:35 IST

कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरु असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरीओळखीतील व्यक्तीनेच अपहरण केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. या मुलाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुर्ला भागातून ठाणे पोलिसांनी शोधून त्याच्या आईच्या ताब्यात सुपूर्द केले.कळवा, जयभीम नगर क्रमांक दोन येथील महात्माफुले नगर एमआयडीसी पाईपलाईनजवळ राहणाऱ्या या सात वर्षीय मुलाचे खेळतांना कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने कळवा पोलीस ठाण्यात २१ जून रोजी दाखल केली. हा मुलगा घरासमोर खेळत असतांना २० जून २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला होता. याप्रकरणी समांतर तपास करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली या अपहरणाचा युनिट एकने समांतर तपास सुरु केला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांनी मुलाच्या अपहरणाची माहिती खबरी आणि पोलिसांच्या व्हॉटसअ‍ॅप गृपवर फोटोसह प्रसारित केली होती. त्याच दरम्यान, हा मुलगा कुर्ला परिसरात असल्याची माहिती काकड यांना एका खबºयाकडून व्हॉटसअ‍ॅपवर मिळाली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक काकड, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, जमादार आनंदा भिलारे, हवालदार अजय साबळे, पोलीस नाईक दादा पाटील, भगवान हिवरे आणि पोलीस अंमलदार माधुरी जाधव आदींच्या पथकाची निर्मिती करण्यात आली. कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस ठाण्यात तो होता. या पथकाने नेहरुनगर पोलीस ठाण्यात जाऊन मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला आता त्याच्या आईच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिाष्ठ पोलीस निरीक्षक कोकणी यांनी दिली.* मुलाकडून मिळाली वेगवेगळी माहिती-अपहरणानंतर थेट कुर्ला भागात तो कसा पोहचला याबाबत या मुलाने वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सुरुवातीला त्याच्याच आईच्या एका मित्राचे त्याने नाव घेतले. परंतू, यातील कोणत्याच बाबी सिद्ध न झाल्याने पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिले. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरु असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र