शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रुणवाल गार्ड सिटीत परांची कोसळून सात कामगार जखमी, दोषींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 15:07 IST

रंगकामांसाठी बांधण्यात आलेली परांची कोसळून झालेल्या अपघातात सात कामगार जखमी झाले असून काहींना उपचारार्थ खाजगी तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिड वर्षापूर्वी बांधली होती परांचीकाही कामगारांची प्रकृती गंभीर

ठाणे - लाकडाची परांची पडून ७ मजूर जखमी झाल्याची घटना बाळकूम परिसरातील रु णवाल गार्डन सिटी इमारतीच्या परिसरात घडली आहे. यामध्ये तीन मजूर गंभीर जखमी झाले असून पाच मजुरांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जवळपास दीड वर्षांपासून ही लाकडाची परांची बांधून ठेवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ती सोडताना ही घटना सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली आहे. दीड वर्षांपासून ही परांची काढली नसल्याने बांबू पूर्णपणे कमकुवत झाल्याने वर चढलेले मजूर सरळ खाली आले. यामध्ये ज्यांच्या निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.                              या घटनेत मोह्हमद राखिबुलह शेख (३०), मोहम्मद रॉयल शेख (२१), जमाल शेष (५०), हसन अली (२४), इक्तीयार युसूफ मोहहम्द (२०), दुलाल सिंग (३२) आणि मनीरुद्दीन शेख (२७) अशी जखमींची नावे आहेत. बाळकूम परिसरातील रुणवाल गार्डन सिटीच्या ए ३ या १८ मजल्यांच्या इमारतीमध्ये ही लाकडांची परांची बांधण्यात आली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास परांची काढण्यासाठी काही मजूर या परांचीवर चढले होते. ही परांची काढण्यात सोडत असतांना हे सर्व मजूर परांचीसकट खाली पडले. यामध्ये सर्वच मजूर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनची टीम काही वेळातच घटनास्थळी पोचले. रुग्णवाहिका उशिरा आल्याने सुरवातीला पाच मजुरांना रिक्षाने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाऊण तासानंतर पाच मजूर हायलँडला दाखल केले असून दोन जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.दरम्यान या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा उघड होईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दीड वर्षांपूर्वी कलरचे काम करण्यासाठी ही परांची बांधली होती. दादा कुंभार म्हणून कंत्राटदार असून संपूर्ण घटनेचा तपास चालू आहे. (प्रकाश निलेवाड - सहाय्यक पोलीस आयुक्त) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात