शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मीरा-भार्इंदर पालिकेची सात महिन्यांत फक्त ३३ टक्केच कर वसुली, ६७ टक्के वसुलीची तीव्र मोहिम सुरु करण्याचे आयुक्तांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे.

- राजू काळे 

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे. कर विभागाच्या या येरे माझ्या मागल्याच्या प्रकारामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्वरीत ६७ कर वसुलीसाठी लवकरच तीव्र मोहिम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

शहरातील एकुण मालमत्तांपैकी पालिकेत केवळ ३ लाख २८ हजार ८७८ मालमत्तांची नोंद आहे. यात २ लाख ७३ हजार ८०७ निवासी तर ५५ हजार ७१ व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तातुन मिळणाऱ्या करापोटी पालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात एकुण २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु, यात वादातित, पुर्वीच्या इमारती धोकादायक ठरल्याने त्या तोडण्यात आल्यानंतरही त्यातील रहिवाशांचा मालमत्ता कर जैसे थे असून पुर्वीच्या मालमत्ता सध्या अस्तित्वात नसल्या तरी त्यापोटी थकीत असलेली तब्बल ८६ कोटींचा कर न होणारी वसुली म्हणून समाविष्ट करण्यात  आली आहे. त्यामुळे करवसुलीचा आकडा फुगविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र १८५ कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट प्रशासनासमोर आहे. यापैकी मागील सात महिन्यांत कर विभागाने ६१ कोटी ८९ लाखांचीच म्हणजेच ३३ टक्यांचीच वसुली केल्याचे निदर्शनास आले आहे. 

गतवर्षी देखील कर विभागाने करवसुलीच्या उद्दीष्टाला हरताळ फासुन सुमारे ३० ते ३५ टक्के कर वसुली केली होती. गेल्या वर्षी प्रशासनाला नोटाबंदीचा फायदा मिळाल्याने जुन्या नोटा स्विकारण्याच्या नावाखाली पालिकेच्या उत्पन्नात भर पडली होती. यंदा मात्र कर वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रशासनाने गतवर्षी उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर निरिक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या कामासाठी जुंपले होते. सुरुवातीला त्यांना थकबाकीदारांच्या दारी केवळ त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २५ हजार रुपये  पर्यंतच्या थकीत कर वसुलीची जबाबदारी देण्यात आली. तत्पुर्वी कर विभागाने थकबाकीदारांच्या दारी बँड बडवुन वसुलीचा फंडा सुरु केला होता. त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बँडची धून विभागाला गुंडाळावी लागली. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांच्या माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील टास्क फोर्सची नियुक्ती करुन मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली. त्यात काही शाळा व भार्इंदर रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. त्यातच पालिकेत कार्यरत असलेल्या व शहरात स्वत:च्या मालकीच्या मालमत्ता असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत कर त्वरीत जमा  न केल्यास त्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरीत थकीत पालिकेत जमा करण्याचा सपाटा लावला होता. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर विभागाकडुन गांभीर्य दाखविले जात नसल्याने यंदाही उर्वरीत ६७ टक्के कर वसुलीसाठी तीव्र मोहिम या आठवड्यातच सुरु करण्याचे संकेत आयुक्तांनी लोकमतला दिले आहेत.