शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:35 IST

सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.

ठाणे  - सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा यातील काहींना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली. तर दोन शेतकºयांसह उर्वरित कार्यकर्त्यांना सोडून दिले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन विरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली शीळफाटा येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण सोमवारी अक्षरश: उधळून लावले. सर्व्हेक्षण होऊ न देण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. मंगळवारी दुपारी ३.३० वा. शीळफाटा येथील दत्त मंदिरात मनसे पदाधिकारी आणि परिसरातील शीळ व पडले गावातील शेतकºयांसोबत बैठक आयोजिली होती. या बैठकीत शेतकºयांनी या सर्व्हेक्षणाला विरोध असल्याची व्यथा मांडल्याचे मनसे पदाधिकाºयांनी सांगितले. या चर्चेत राजेश कदम व रवींद्र मोरे यांनी संबंधित अधिकाºयांना भेटून जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत सर्व्हे थांबवावे,असे निवेदन देण्याचे ठरविले. अर्धा तास चर्चा झाल्यावर त्या ठिकाणाहून मनसे पदाधिकारी शेतकºयांना सर्व्हेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांच्यासह दोन शेतकºयांनाही ताब्यात घेतले.यात मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले, मनविसे शहर सचिव प्रतिश मोरे, शाखाध्यक्ष सागर भोसले, प्रभाग अध्यक्ष दिनेश पाटील, उपविभाग अध्यक्ष शरद पाटील, मनविसे शाखाध्यक्ष कुशल पाटील, जयेश भगत अशा १३ पदाधिकाºयांसह तर नंदकुमार पाटील व निलेश वासकर या दोन शेतकºयांचा समावेश होता.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मनसेचे नेते राजू पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सरकारी कामात अडथळा आणणे आणि बेकायदेशीर जमाव गोळा करणे या गुन्ह्यांतर्गत यातील सात जणांना शीळ डायघर पोलिसांनी अटक केली. तर दोन शेतकºयांसह उर्वरिताना सोडून दिले. अटक केलेल्या सात जणांमध्ये रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले,कुशाल पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.दडपशाहीचा मार्ग सरकार आजमावत आहे. या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. बुधवारपासून हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल.- अविनाश जाधव, ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष

टॅग्स :MNSमनसेBullet Trainबुलेट ट्रेनnewsबातम्या