शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
4
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
5
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
6
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
7
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
8
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
9
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
10
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
11
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
12
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
13
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
14
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
15
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
16
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!
17
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
18
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
19
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
20
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी

तब्बल सात तास मृतदेह रस्त्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:43 IST

डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप राऊत (२२) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी नडगाव (खडवली) येथे घडली.

टिटवाळा : डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप राऊत (२२) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी नडगाव (खडवली) येथे घडली. मात्र, घटना घडूनही दोन तासांनंतर पोलीस घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अखेर, जवळपास सात तासांनंतर नातेवाइक व जमावाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.राऊत हा सकाळी ११ च्या सुमारास दुचाकीवरून फळेगाव-खडवली या रस्त्याने दानबावहून पडघा-आतकोली येथील घरी चालला होता. त्यावेळी नडगाव येथे एका भरधाव डम्परने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात राऊत खाली पडताच त्याच्या अंगावरून डम्पर गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्परचालकाने पलायन केले. दुसरीकडे त्याचे नातेवाइक घटनास्थळी दाखल झाले. घटना घडून दोन तास झाल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता. त्यामुळे संतप्त झालेले नातेवाइक व जमावाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास हरकत घेतली. त्यामुळे पोलिसांनी जादा कुमक मागवली. यावेळी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाची समजूत घातल्यानंतर डम्परचालक आणि मालक यांच्याविरोधात भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अखेर, सात तासांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पाेिलसांनी तो विच्छेदनासाठी पाठवला आहे.दरम्यान, या अपघाताला महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या.