शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाची हत्या करणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:10 IST

ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही,

कल्याण : ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही, म्हणून कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांच्यावर अ‍ॅसिड टाकत, २५ जणांच्या जमावाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना २५ सप्टेंबर १९८६ रोजी घडली होती. तब्बल ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील सात आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सरकारी जमिनीपैकी ११ एकर जमीन बाळू गायकर (रा. वासिंद) यांच्या नावे करून देण्यास नकार दिला होता. या वादातून २५ सप्टेंबर १९८६ रोजी बाळूसह २५ जणांचा जमाव हरिभाऊ यांच्या घरावर अ‍ॅसिड, काडतुसे, लाठ्याकाठ्या, तलवार आणि कुºहाडी घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी दुकानात जात असलेल्या हरिभाऊच्या पुतण्याला जमावाने शिवीगाळ केली. जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचे काका वसंत तिथे गेले असता, जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात हरिभाऊ यांच्यासह त्यांच्या घरातील १२ जण जखमी झाले होते. सरकारी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी हरिभाऊ यांना मृत घोषित केले. 

याप्रकरणी हरिभाऊ यांचे भाऊ नारायण यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार आणि पुरावे तपासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळू ऊर्फ लखा गायकर (रा. वासिंद), भाऊ दिवाणे, पांडुरंग दिवाणे, लक्ष्मण दिवाणे, एकनाथ दिवाणे, सुरेश गायकर आणि चंद्रकात गायकर (सर्व रा. गेरसे, ता. कल्याण) या सात आरोपींना जन्मठेपेसह ५० हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली.सुमारे ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली असून, आता बहुतांश आरोपींचे वय ६५ ते ७० च्या जवळपास आहे. २५ पैकी ११ आरोपींचा खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच मृत्यू झाला असून, खटल्यातील काही साक्षीदारांचादेखील मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय