शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘भिवंडीच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर तोडगा काढा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:47 IST

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली.

- रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली. या पाणी टंचाईचे पडसाद भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील, सदस्य प्रकाश भोईर यांनी गाजवला. तर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरल्याने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक बुधवारी बोलावली. या बैठकीत पाणीप्रश्न पेटला. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावपाड्यातील पाणी टंचाईचा पाढाच वाचला. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत माहिती दिली. लोनाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बापदेव पाडा येथील पाणी टंचाई संबंधी ‘खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची आली वेळ’, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाºयांच्या तोंडचे पाणी पळाले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी पाड्यास भेट दिली आणि तेथे बोरवेल मारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. स्वाती खाण यांनी दिली. तर मैदे येथील बातरेपाडा, हरेपाडा, रावते पाडा येथील पाण्याचा प्रश्न ‘लोकमत’मधील बातमीमुळे मिळाल्याचे आ. मोरे यांनी सांगितले.या बैठकीत पाणी टंचाई संबंधी ग्रामसेवकांनी माहिती दिली. त्यावर आक्र मक होत कारणे सांगू नका, गावपाड्यातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम ग्रामसेवकांचे आहे. ग्रामसेवकांनी आपले गाव समजून जर काम केले तर पाणीटंचाई निर्माणच होणार नाही, आणि टंचाईबाबत बैठका घेण्याची वेळच येणार नाही, असे सांगून पाणीपुरवठा विभागाने गावपाड्यातील टंचाईचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून पंधरा दिवसांत पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना आ. शांताराम मोरे यांनी सभेत दिले आहेत.पाणीटंचाईसह आदिवासींसह नागरिकांना भेडसावणाºया समस्या मांडून त्या दूर करण्याची मागणी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी अधिकाºयांकडे केली आहे. त्या न सोडवल्यास संघटना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. त्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. पाण्यासाठी बैठका घेण्याची वेळ येऊच नये, असे भिवंडी पंचायत समिती सभापती रवीना जाधव यांनी सांगितले. तसेच नादुरूस्त बोरवेल दुरूस्त करा, नवीन बोरवेल मारून टंचाई दूर करा असेही त्या म्हणाल्या. ‘लोकमत’मुळे आम्हाला ही टंचाईची माहिती मिळते, यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, सुदेश भास्करराव यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कवाड येथील तलावाचा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र काबाडी यांनी केली. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले. सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या बैठका घेऊन टंचाईवर मात करणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के म्हणाले.लोकमतचे मानले आभारपाणीटंचाई संबंधी दोन वर्षांपासून सातत्याने सचित्र ‘आँखो देखा हाल’ ‘लोकमत’ने जनतेसमोर आणला. यामुळे झोपी गेलेले प्रशासन जागे झाले. त्यामुळे गावपाड्यातील गरीब, कष्टकºयांना पाणी मिळते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी, सभापतींनी ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळbhiwandiभिवंडी